आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळले
schedule01 Jul 25 person by visibility 81 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभाग व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून शहरामध्ये आज 3711 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळून आले आहेत. शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु आहे. प्रामुख्याने या सर्व्हेक्षणात कावीळ, डेंग्यू या आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. आज शहरामध्ये 15343 नागरीकांची तपासणी केली असता या तपासणीत 13 तापाचे रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर 7 नागरीकांचे रक्तजल नमुने तपासणीठी घेण्यात आले. तर 36 घरांमध्ये डेंग्यु डास अळी आढळून आली.
4361 घरांतील कंटेनरची तपासणी करुन त्यातील 28 कंटेनर रिकामी करण्यात आली. तर 8 कंटेनरमध्ये टॅमिफॉस हे औषध टाकण्यात आले. आरोग्य विभाग व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून सर्व्हे करताना नागरीकांना डेंग्यू बाबत माहिती पत्रके वाटप करण्यात आली. त्याचबरोबर नागरीकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली.
हे सर्व्हेक्षण प्रामुख्याने महाकाली मंदिर, संध्यामठ गल्ली, राजघाट रोड, आयरेकर गल्ली, रंकाळा रोड, करवीर तीर्थ अपार्टमेंट, गांधी मैदान परिसर, देशपांडे गल्ली, साकोली कॉर्नर, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहुपुरी, मातंग वासाहत, बागल चौक, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, दुधाळी, गंगावेश, पंचगंगा तालीम, उत्तरेश्वर पेठ, उलपे मळा, गोळीबार मैदान, पिंजार गल्ली, शिवाजी नगर, संकपाळ नगर, आंबेडकर नगर, कागलवाडी परीसर, दत्तमंदिर परिसर, रेणुका मंदिर, महाडिक माळ, रुईकर कॉलनी, टाकाळा, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, मोतीनगर, वर्षानगर, रामानंदनगर, जरगनगर, साळुंखेनगर, खाणबाग, एसएससी बोर्ड, गंगाई लॉन, अंबाई टँक, हरी ओमनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, बोंद्रेनगर, घरकुल योजना, कारंडे माळ, मसीद मोहल्ला, पाटोळेवाडी, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, माळ गल्ली, विठ्ठल मंदिर, इंद्रजित कॉलनी, महालक्ष्मीनगर, माळगल्ली, विट्टलमंदीर, महालक्ष्मीनगर, गोविंदपार्क, नाळे कॉलनी, रचनाकर हौसिंग सोसायटी, सुर्वेनगर, बापूरामनगर, प्रथमेशनगर, देवकरपानंद, जनाई दत्तनगर, पाचगावरोड, अनंतप्राईड, जेलपरीसर, सुर्वेकॉलनी, साळोखेनगर, शिवगंगा कॉलनी व पंचगाव या भागामध्ये करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्समार्फत या भागात जनजागृती करण्यात आली. तसेच नागरीकांनी स्वच्छ साठलेले व साठविलेले पाणी आठवडयातून एकदा रिकामे करुन कोरडा दिवस पाळणे अत्यंत आवश्यक असत्याचे सांगण्यात आले. तसेच ताप आल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.