कोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाई
schedule01 Jul 25 person by visibility 240 categoryमहानगरपालिका

▪️अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत 6 केबिन, 3 हातगाड्या, 38 फुले स्टॅन्ड, 26 छत्र्या जप्त
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत मंगळवारी पर्ल हॉटेल ते महादेव मंदिर या पसिरातील मुख रस्त्यावरील अनधिकृत केबिन व दुकानाबाहेर लावण्यात आलेले साहित्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 6 केबिन, 3 हातगाड्या, 38 फुले स्टॅन्ड, 26 छत्र्या जप्त करण्यात आल्यात तसेच 23 अनधिकृत केबिन बाहेरील छपऱ्या काढण्यात आल्या तर 7 केबिन स्वतः मालकांनी काढून घेतल्या.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळूंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे व अतिक्रमण कर्मचारी-यांच्या मार्फत करण्यात आली.
तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने येथून पुढेही शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.