दहिहंडीनिमित्य के.एम.टी. मार्गात बदल
schedule17 Aug 22 person by visibility 1420 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयामध्ये दि. १९ ऑगस्ट रोजी कृष्णजन्माष्टमीनित्य होणाऱ्या दहिहंडीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करणेत येणार आहे. याकरीता दुपारी 3.00 नंतर शहरांतर्गत के.एम.टी.चे बसमार्गात खालीलप्रमाणे तात्पुरता बदल करणेत येणार आहे.
१) गंगावेश वाहतूक नियंत्रण केंद्रावरील सर्व बसेस (शिरोली दुमाला, बहिरेश्वर, हणमंतवाडी) रंकाळा टॉवर श्री जाऊळाचा गणपती येथून मार्गस्थ होतील.
२) जठारवाडी बस सोन्यामारुती चौक येथून मार्गस्थ होईल.
३) वळीवडे बस महाराणाप्रताप चौकपर्यंत धावेल.
४) कळंबा, पाचगांव, सुर्वेनगर, आर.के.नगर, बोंद्रेनगर, कंदलगांव, क्रां.नानापाटीलनगर, बाचणी, येवती, चुये, मुडशिंगी, वडगांव, रुकडी, कागल या बसेस स्टँडमार्गे सुटलेनंतर लक्ष्मीपुरी, गोखले कॉलेज, मेजर ध्यानचंद स्टेडीयम, संभाजीनगर बोद्रेनगर मार्गे ये-जा करतील.
५) राजारामपुरीमार्गे आर.के.नगर मार्गावर धावणाऱ्या बसेस महाराणा प्रताप चौक येथून सुटतील.
६) तसेच सायंकाळी 4.00 नंतर रुकडी, वडगांव, कागल, शिये, कदमवाडी, नागांव, शिरोली, गांधीनगर, वळीवडे या मार्गावर जाणेसाठी श्री शाहू मैदान, बिंदू चौक, शिवाजी चौक, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, शारदा कॅफे येथे बसच्या प्रतिक्षेत उभारणाऱ्या प्रवाशांनी उषा टॉकीज येथे बससाठी थांबणेचे आहे.
७) कुडीत्रे गांवाची सेवा दुपारनंतर बंद ठेवणेत येईल.
तसेच दुपारी 2.00 नंतर मार्गस्थ बसेसची संख्या कमी ठेवणेत येणार आहे. त्यामुळे दैनंदिन एक दिवसीय पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनी उपलब्ध बससंख्येचा विचार करुन आवश्यक असलेस वाहकांकडून एक दिवसीय पास खरेदी करावा .
तरी सर्व प्रवासी नागरीक, विद्यार्थी व सवलत पासधारकांनी या बदलाची नोंद घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.