E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत
schedule06 Feb 26 person by visibility 176 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे.
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने या बाबीचा सकारात्मक विचार करून, ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद केली आहे, अशांसाठी ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून दिली आहे.
यासंदर्भात योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली आहे.