SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकरवीज दरवाढीतून महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा : सतेज पाटील यांचा आरोप : प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणीवेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात 20 फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश लागूपरीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारीकोल्हापूर शहराला सोमवारी, मंगळवारी अपूरा व कमी दबाने पाणी पुरवठाE-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदतमानवी विचारशक्तीला तंत्रज्ञान हा पर्याय नाही : प्रा. पर्सी इंजिनिअर; ‘रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

जाहिरात

 

कोल्हापूर शहराला सोमवारी, मंगळवारी अपूरा व कमी दबाने पाणी पुरवठा

schedule06 Feb 26 person by visibility 148 categoryमहानगरपालिका

▪️शहरात शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी या पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरु राहणार

 

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे काळम्मावाडी 33 केव्ही विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनच्या ठिकाणी आयसोलेटर बसविण्याचे कामकाज महावितरणमार्फत हाती घेण्यात येणार असलेने सोमवार व मंगळवार, दि.9 व 10 फेब्रुवारी 2026  रोजी विद्युत पुरवठा बंद रहाणार आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

 तसेच शहरास पाणी पुरवठा करणेसाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी या पंपींग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असलेने शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार व मंगळवार, दि.9 व 10 फेब्रुवारी 2026  रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तसेच बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026  रोजी होणारा पाणी पुरवठा सुरळीत होईल.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवारपेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदुचौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब परिसर व त्यास सलग्नीत ग्रामिण भाग व उपनगरे. तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजीपार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी राजीवगांधी वसाहत परिसर, लोणार वसाहत परिसर, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्टेशन, राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली परिसर, मातंग वसाहत परिसर, यादवनगर परिसर, उद्यमनगर परिसर, शास्त्रीनगर परिसर, राजारामपुरी एक्स्टेंन्शन, टाकाळा परिसर, पांजरपोळ परिसर, सम्राटनगर परिसर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, दौलतनगर परिसर, शाहूनगर परिसर, राजेंद्रनगर परिसर, इंगळे मळा परिसर, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर ग्रीनपार्क परिसर, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ परिसर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार नाही. 

तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes