SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेतकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा ; प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे महत्त्वपूर्ण निर्देश शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नयेत : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरगृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्युएस आय-गेज ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस’ पुरस्कारसंरक्षण समिती गठीत करण्याबाबत आवाहनबिगर शासकीय संस्थांच्या वित्तीय व्यवस्थापन व लेखांकनाविषयी विद्यापीठात १० जानेवारीला व्यवस्थापन विकास कार्यक्रमआरटीओ मार्फत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन

जाहिरात

 

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन

schedule03 Nov 24 person by visibility 660 categoryराज्य

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता. 

समीर खान यांचा कुर्ला येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांचे रविवारी निधन झाल्याची माहिती स्वतः माजी मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली.

 या अपघातानंतर कारचालकाला ताब्यात घेऊन विनोबा भावे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी पुढील काही दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes