खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मंजुर झालेल्या विकासकामांचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ
schedule10 Nov 25 person by visibility 60 categoryसामाजिक
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून, कोल्हापुरातील खोल खंडोबा आणि शिपुगडे तालीम परिसरातील विकास कामांसाठी निधी देण्यात आला आहे. या विकासकामांचा प्रारंभ युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून कोल्हापुरातील विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी निधी मंजुर झाला आहे. त्यापैकी खोल खंडोबा हॉल परिसरातील वेल्हाळ बाग येथे पॅसेजचे कॉंक्रीटीकरण आणि गटर कामांसाठी २० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे उद्घाटन, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक किरण शिराळे यांच्या हस्ते झाले. या या प्रभागाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक कटिबध्द असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान प्रभागातील नागरिकांनी कृष्णराज महाडिक यांची मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी विशाल शिराळे सुरेश काळे, बाळासो कद्रे, अमरसिंह शिंदे, तात्या यादव, अमोल लिंगम, युवराज पोवार, सुनील पाटील यांच्यासह वेल्हाळबाग परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि माजी महापौर सुनंदा मोरे यांच्या प्रभागातील शिपुगडे तालीम जवळचा कॉंक्रीट पॅसेज बनवण्यासाठी १० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला. येथेही कृष्णराज महाडिक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज मोरे संतोष भोसले, सागर दळवी, सुनील पाटील, राहूल घाटगे, रणजित रजपूत, आर के जाधव, किशोर घाटगे, धिरज मुळे, अमेय भालकर, निलेश हंकारे उपस्थित होते.