संजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला
schedule09 Nov 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक
▪️राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे यांची प्रमुख उपस्थिती
आतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार,पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर ९२१ तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे . यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत,अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी दिली.
संजय घोडावत विद्यापीठाने स्थापनेपासून शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देत शिक्षणाच्या सर्व अंगांचा समतोल साधला आहे. या सातव्या दीक्षांत समारंभाद्वारे विद्यापीठ पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरित करणार आहे.
विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.