कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर प्रतिटन एफआरपी अधिक २०० रूपये जाहीर
schedule10 Nov 25 person by visibility 101 categoryउद्योग
इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या ३३ व्या ऊस गाळप हंगामाची एफआरपी प्रति मे. टन रूपये ३३१८ व अतिरिक्त प्रति मे.टन रू. २०० म्हणजेच एकूण प्रति मे.टन रू. ३५१८ प्रमाणे ऊस पुरवठादारांना देण्याचे कारखाना व्यवस्थापनाने निश्चित केले आहे.
यापैकी गाळपास येणाऱ्या ऊसास विनाकपात एकरकमी प्रति मे.टन रू. ३४०० प्रमाणेची रक्कम नियमाप्रमाणे १४ दिवसात व हंगाम समाप्तीनंतर एक महिन्यामध्ये उर्वरित प्रति मे.टन रू.११८ प्रमाणे रक्कम आदा करण्यात येईल.
तेंव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याकडून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन नेहमी देण्यात येते. अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे. तेंव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.