SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुचाकीसाठी नवी नोंदणी मालिका 3 जूनपासूनस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईइंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी: वाहन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ!वसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!आधुनिक भारताचे शिल्पकार: पंडित जवाहरलाल नेहरूगणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहिती

जाहिरात

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

schedule27 May 26 person by visibility 87 categoryराज्य

  पुणे : पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ व ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही.

  पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे ५ व २५ मे २०२६ रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली. सदर सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उप आयुक्त प्रतिभा पाटील यांनी कळविली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes