SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटील

schedule14 Apr 26 person by visibility 344 categoryसामाजिक

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण समिती संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एक 135 जयंती साजरी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तुळस वृंदावन रोपास जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन आदित्य कांबळे व अमृता ठोंबरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभुदास दाभाडे आरोग्यरक्षक मुकादम मनोज कुरणे केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील ज्येष्ठ शिक्षक उत्तम पाटील  शाळा व्यवस्थापन महिला सदस्य शितल पाटील,नीलम पाटोळे, व विद्या पाटील मॅडम,तमेजा मुजावर मॅडम प्रमुख उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्तम पाटील यांनी केले सूत्रसंचालन तमेजा मुजावर यांनी केले  
 
 केंद्रमुख्याध्यापक  डॉ अजितकुमार पाटील यांनी डॉ.आंबेडकरांचे कार्य व त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगितले.त्यामध्ये त्यांनी
" माणसाचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडायचे असेल तर प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे व गरजेचे आहे .जगात फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशु आणि माणूस यात काय फरक असतो.कोणतेही कार्य करत असताना आपल्या अंगची गुणवत्ता स्थिरावली पाहिजे. त्यासाठी संस्कारक्षम असे गुणच उपयोगी ठरतात. शिकलेल्या माणसात काही दिवस असतात शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा त्याचा दोष  नव्हे तर दोष व तुमच्या अंगात शिरणार नाही त्याची खबरदारी घ्या.
आपले कर्तव्य कोणते आणि भावना कोणती ही जोपर्यंत जागृत होत नाहीत तोपर्यंत मनुष्य शिक्षणाने सक्षम आहे का नाही हे ठरणार असते त्यासाठी शिक्षण उपयोगी आहे. शिक्षणाने शिका व संघटित व्हा , हा याचा मुख्य उद्देश त्यांनी सांगितला असे प्रतिपादन केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी केले .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भाषणे सादर केली.सदर भाषण स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे 
प्रथम क्रमांक -आदित्य कांबळे,द्वितीय क्रमांक अमृता ठोंबरे, तृतीय क्रमांक स्वरा पाटील 

 शिक्षण सदस्य शितल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माता पालक सदस्य विद्यार्थी माजी विद्यार्थी शिक्षण सदस्य तसेच  विद्यार्थी, शिक्षक- शिक्षिका  उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राहुल दुधाने यांनी मानले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes