SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या सौंदर्य स्पर्धाबीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात… घरकुल बांधणीत बीड जिल्ह्याने रचला नवा विक्रम!इस्रोच्या स्थापनेतील शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन टेन्शन वाढलं? : महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट होणार३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम : मंत्री ॲड.आशिष शेलारऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री ; राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारामराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्याप्रमाणात आयोजन करणार : ॲड.आशिष शेलारसेवाभावी संस्थांची सामाजिक बांधिलकी...आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलजलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी

जाहिरात

 

इस्रोच्या स्थापनेतील शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

schedule22 Oct 25 person by visibility 66 categoryराज्य

मुंबई  : भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि इस्रोच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिल्पकार डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे बुधवारी (22 ऑक्टोबर 2025) पुण्यात निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या डॉ. चिटणीस यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. चिटणीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात PRL मध्ये कॉस्मिक किरणांवर संशोधन करून केली आणि पुढे अमेरिकेतील MIT येथे प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण घेतले. 1961 मध्ये डॉ. विक्रम साराभाईंच्या विनंतीवरून ते भारतात परतले आणि देशातील पहिलं उपग्रह टेलिमेट्री स्टेशन उभारलं. त्यांनी थुबा (केरळ) येथे भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपण केंद्राची जागा निश्चित केली. याच ठिकाणी 1963 मध्ये Nike Apache रॉकेट प्रक्षेपित झाले, ज्याने भारताच्या अंतराळ प्रवासाची पहिली पायरी गाठली. पुढे त्यांनी श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्राची निवड करून भारताच्या मोहिमेचा पुढील पाया रचला.

 1975-76 मधील Satellite Instructional Television Experiment (SITE). या प्रयोगाद्वारे नासाच्या ATS-6 उपग्रहाच्या साहाय्याने 6 राज्यांतील 2400 गावांपर्यंत शिक्षण आणि आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्यात आली. 

डॉ. चिटणीस यांनी तरुण वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निवडीमध्येही मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 1985 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes