टेन्शन वाढलं? : महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट होणार
schedule22 Oct 25 person by visibility 76 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रिमंडळात सध्या कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं ऑडिट सुरू केले जाणार आहे. या ऑडीटला आतापासूनच सुरूवात झाली असल्याचे देखील सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळात बदल न होता सध्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी दिलासा असला तरी मंत्र्यांचे टेन्शन कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मतदारसंघासोबतच पालकमंत्रिपद दिलेला जिल्हा या सर्वच ठिकाणी स्वतःची ताकद आणि किमया मंत्र्यांना दाखवावी लागणार आहे. नाही तर या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चत झाले आहे. सध्या फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ जवळपास पूर्ण होत आहे.
त्यामुळे याच कार्यकाळातील निर्णय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच १०० दिवसांचा कार्यक्रम त्यानंतर लगेच १५० दिवसाचा कार्यक्रम हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी मंत्र्यांना आगोदरच आखून दिले आहेत. त्यामुळे अशा या सर्व कामांचा ऑडिटच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.