नवी दिल्ली : श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये सतत परकीय चलन निधी कमी होत असल्याने समस्या वाढत आहेत. नेपाळ सरकारने 10 लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. मोहरीच्या तेलासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे नेपाळ सीमेला लागून असलेला जोगबनी बाजारात लोकांचा ओढा वाढत आहे. लोक भारतीय बाजारातून वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.
विदेशी मद्य, अगरबत्ती, डिझेल आणि पेट्रोल वाहने, 250 सीसीच्या बाईक, चिप्स, क्रिस्प्स, डायमंड, 600 डॉलरपेक्षा जास्त किंमतीचे मोबाइल फोन, खेळणी, कार्ड्स, 32 इंचांपेक्षा जास्त असलेले टीव्ही इत्यादींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे,
नेपाळ सरकारच्या आयात निर्यात कायदा 2013 च्या कलम 3 अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून, अनेक गोष्टींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.