SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामाचित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार

जाहिरात

 

जैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरे

schedule24 Sep 26 person by visibility 150 categoryराज्य

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या अति वापरामुळे सध्या शेतीतील मातीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताला फारसे प्राधान्य न देता जैविक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहा.कृषी अधिकारी संतोष मोरे यांनी केले. शासनाच्या 'लोकसंवाद' या उपक्रमांतर्गत मौजे खुपिरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. 
 यावेळी माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीपती माधुरी पाटील - निकम,उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक(उपजीविका) प्रकाश लाड,जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र शिरोळकर तसेच पाणी फाउंडेशन चे फिल्ड ऑफिसर ओंकार सुर्वे उपस्थित होते.

  मोरे म्हणाले, महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत साधारणतः शंभरहून अधिक योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

 श्रीमती माधुरी पाटील म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गंत शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास शासनाकडून किमान दोन लाखापर्यंत मदत मिळते तसेच अपघातग्रस्त झाल्यास 50 हजारांपर्यंत मदत मिळते तर रवींद्र शिरोळकर म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत,त्याकरिता कृषी विभागाकडून विविध योजनांसाठी साधारणतः 35 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री अन्न सुक्ष्म प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कागदपत्रे, तांत्रिक बाबी तसेच शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते असल्याची माहिती दिली.

  यावेळी येथील खुपिरे येथील माऊली शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने विविध प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केली. करवीर तालुक्यामध्ये महिला व पुरुषांचे सुमारे 96 शेतकरी गट कार्यरत आहेत.
यावेळी माऊली शेतकरी गटाचे अध्यक्ष संजय पाटील, खुपिरेच्या कृषी सहाय्यक उर्मिला सरनाईक, पूजा खोत, दामू दाते, सतीश शेंडगे यांच्यासह इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes