SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

जाहिरात

 

चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जग

schedule23 Sep 26 person by visibility 109 categoryशैक्षणिक

◼️पोलीस ठाणे, रुग्णालयापासून रेल्वे स्टेशनपर्यंत हुबेहूब निर्मिती; चित्रपट निर्मितीचे घेतले प्रत्यक्ष धडे

कोल्हापूर: पडद्यावर दिसणारे गाव, वाडे, पोलीस ठाणे, रुग्णालय, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन किंवा मंदिर प्रत्यक्षात कसे उभे केले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि बी.ए. फिल्म मेकिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी घेतला. कोल्हापूर चित्रनगरीतील विविध चित्रीकरण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी चित्रपट निर्मिती आणि कलादिग्दर्शनामागील सर्जनशीलतेचे बारकावे जाणून घेतले.

मास कम्युनिकेशन आणि बी.ए. फिल्म मेकिंग विभागातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी  एकदिवसीय शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक्रमातील चित्रपट निर्मितीच्या संकल्पना प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वातावरणात समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या भेटीत मिळाली.

चित्रनगरीतील जुना वाडा, नवा वाडा, चाळ, बंगला, गावभाग तसेच मालिकेसाठी उभारण्यात आलेला क्रोमा फ्लोअर विद्यार्थ्यांनी पाहिला. याशिवाय सुरू असलेल्या दोन-तीन चित्रीकरण फ्लोअर्सनाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. एकाच इमारतीत वेगवेगळ्या कथानकांसाठी पोलीस ठाणे, रुग्णालय, घर, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय उभारण्यात आल्याचे  विद्यार्थ्यांनी पाहिले. 
रेल्वे स्टेशन, नदीघाट आणि मंदिराचे सेट्सही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली ठिकाणे मर्यादित जागेत आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे पडद्यावर विश्वासार्ह दिसतील अशा पद्धतीने कशी साकारली जातात, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. चित्रनगरीचे कर्मचारी विक्रम विष्णू वडर आणि सचिन कुडचे यांनी विद्यार्थ्यांना विविध लोकेशन्सची माहिती देत संपूर्ण परिसराची सफर घडवून आणली. 

दरम्यान, अभिनेते उमेश बोळके आणि ‘मालिकेतील बाल विष्णूची भूमिका साकारणारा बालकलाकार तक्षशील भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षक अनुप जत्राटकर आणि  डॉ. कविता गगराणी  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही शैक्षणिक भेट यशस्वी करण्यासाठी   मास कम्युनिकेशन आणि बी.ए. फिल्म मेकिंग विभागाचे समन्वयक  डॉ. शिवाजी जाधव आणि कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप भांदिगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes