"नवजीवन क्लिनिक" चा पहिला वर्धापनदिन उत्साहात
schedule23 Jan 25 person by visibility 655 categoryआरोग्य
कोल्हापूर : येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक फुलेवाडी रिंग रोड येथे असलेल्या नवजीवन क्लिनिक अँड डे-केअर हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या उत्साही सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, पहिल्या वर्धापन दिनाच्या केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्लिनिकमध्ये सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते.
आपला पहिला वर्धापन दिन सोहळा साजरा करताना डॉ. अनिकेत रासकर यांनी गेल्या वर्षभरातील त्यांच्या क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार घेतलेल्या काही निवडक रुग्णांचा सत्कार केला तसेच यावेळी काही रुग्णांनी आपले अनुभव कथन केले.
नवजीवन क्लिनिक मध्ये मिळणारी रुग्ण सेवा ही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे, असे रुग्णांनी आपले मत व्यक्त केले, आणि डे-केअर ची सेवा, तिथे उपलब्ध असणारी सुविधा, आणि अल्पावधीतच, रिंग रोड परिसरात मिळवलेली विश्वासार्हता, तसेच क्लिनिकमध्ये उत्कृष्ट सेवा देणारे कर्मचारी यांचेही कौतुक करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यामध्ये डॉ. रामराव पाटील, डॉ. मारुती यादव, सत्यनारायण शर्मा, बाबुराव मकोटे, नागेश स्वामी, बाळासाहेब माडेकर रवींद्र निकम, प्रसाद मायनेकर, बाळासाहेब मोळे, पत्रकार एस. पी. चौगुले, अभिजीत चौगुले, विजयसिंह सावंत, विनायक कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, पी एस पाटील, आर ए कांबळे, रणधीर पाटील, इचलकरंजी हून आलेले मुकुंद बडे व पांडुरंग मांगलेकर, फॅमिली फार्माचे अमित इंगळे, मेघा इंगळे, किरण जोशी, अविनाश हावळ, आर. डी. पाटील, पत्रकार शिवराज सावंत, अभिनव रासकर, जयश्री शिंदे, गीता चव्हाण, सुनिता रासकर, उर्मिला मोळे, वैशाली कदम, अभिजीत गुळवणी, सायली वाळवेकर, वंदना पाटील, लक्ष्मी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, आभार डॉ. देवेंद्र रासकर यांनी मानले.