SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठकोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण१५५ वर्षांची गौरवशाली परंपरा: मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखात प्रारंभ शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार यड्रावकरमांगनूर येथील रस्ता गावाबाहेरून काढाकेडीसीसी बँक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत राज्यात अग्रभागी मद्रास दिवस: दक्षिण भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा ऐतिहासिक प्रवासकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजरा

जाहिरात

 

कोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

schedule22 Aug 26 person by visibility 152 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर आगाराच्या ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल झाल्या आहेत. या नव्या बससेवेचे लोकार्पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एस.टी. महामंडळाकडून विविध आगारांमध्ये नवीन बस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ ’ बस उपलब्ध झाल्या आहेत.

या बसमुळे कोल्हापूर आगारातील बससेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, ग्रामीण तसेच शहरालगतच्या मार्गांवरील प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. जुन्या बसांवरील प्रवाशांचा ताण कमी करण्याबरोबरच नियमित आणि वेळेवर बससेवा देण्यासही या नव्या बस उपयुक्त ठरणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेसमुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील.  प्रवाशांना चांगली सेवा मिळणे ही एस.टी. महामंडळाची प्राथमिकता असल्याचे सांगितले. नव्या बसचा योग्य वापर करून प्रवाशांना सुरक्षित व समाधानकारक सेवा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी उपाधीक्षक (धावशाखा) संजयसिंह चव्हाण,
विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर, विभागीय वाहतूक अधिक्षक सागर पाटील, सुरक्षा व दक्षता कधिकारी भानुदास मदने, बसस्थानक प्रमुख मल्लेश विभुते,
आगार व्यवस्थापक गणेश कोळी,स.का. अधिक्षक अतुल मोरे, विजय निगडे,
मानीनी तेलवेकर यांचेसह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, चालक-वाहक, कार्यशाळा कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. नव्या ‘राजमाता’ बस कोल्हापूर आगाराच्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes