SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवातकोल्हापुरात भीषण अपघात: पुलावरून कार ४० फूट ओढ्यात कोसळली, एकाचा मृत्यू, तिघे जखमीकोल्हापूर : दारूच्या नशेत रोजचा मारहाण अन् छळ; शेवटी मुलानेच काढला बापाचा काटा!कोल्हापुरात ज्वेलर्स दुकान फोडणारा चोरटा गजाआड!मोफत तुर बियाणे संच वाटपकोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या ऋषिकेश दौऱ्यामुळे ५ जूनचा जनता दरबार ११ जून रोजी होणारवारणेच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा : आमदार डॉ विनय कोरे; वारणा दूध संघाच्या २९ निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकार

schedule04 Jun 26 person by visibility 204 categoryराज्य

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुले पोहण्यासाठी पाणी असलेल्या ठिकाणी गर्दी करत असतात. अनेकदा पालक किंवा स्थानिक तरुण मुलांना पोहायला शिकवत असताना, स्वतः प्रशिक्षण घेणारे किंवा शिकवणारे व्यक्ती पाण्यात बुडाल्याच्या दुर्दैवी घटना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात घडल्या आहेत. या वाढत्या घटनांचा गांभीर्याने विचार करून, आपत्कालीन जीवन रक्षक दिनकर कांबळे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

शिक्षणमंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे खास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रशिक्षणात (सात, आठ, नऊ तारखेला) सहभागींना स्वतःचा जीव कसा वाचवायचा आणि पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित कसे बाहेर काढायचे, याचे तंत्र आणि टिप्स विनामूल्य शिकवल्या जाणार आहेत.

ज्या नागरिकांना पोहता येते आणि ज्यांना या प्रशिक्षणात भाग घ्यायचा आहे, त्यांनी आपला सहभाग नोंदवण्यासाठी ९८६०९४५९२४ या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन दिनकर कांबळे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes