SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!वाळवंटीकरण रोखूया, धरणीला हिरवेगार करूया: जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिनअतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी

जाहिरात

 

मोफत तुर बियाणे संच वाटप

schedule03 Jun 26 person by visibility 225 categoryराज्य

कोल्हापूर : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांना खरीप हंगामात तुर पिकाचे बियाणे संच / सीडकीट  (5 वर्षाच्या आतील वाणाचे 4 किलो प्रती सीडकीट याप्रमाणे) 300 संख्या सीडकीट इतके लक्षांक प्राप्त झाले आहे. तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर   / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. 

यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे.  अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.

 तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी / कृषी सेवक किंवा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे  यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes