SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त; कोल्हापुरातील निवासस्थानी सांत्वनासाठी गर्दीमहापालिका शाळांमधील 755 विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास पासविद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणीगर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमान

जाहिरात

 

महापालिका शाळांमधील 755 विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास पास

schedule07 Aug 26 person by visibility 80 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या 755 विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास पास देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या पासचे वितरण आज महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आले. या उपक्रमामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने  महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान  यांच्या वतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना 150 स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे सकाळी आयोजित कार्यक्रमात उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.

  यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शिला सोनुले, पाणीपुरवठा समिती सभापती सौ. संगीता सावंत, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, प्रभाग समिती सभापती सौ. अनुराधा खेडकर, गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसेवक ऋतुराज क्षिरसागर, अभिजित खतकर, अश्किन आजरेकर, वैभव माने, अजय इंगवले, स्वरूप कदम, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका सौ. निलीमा पाटील, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. वंदना मोहिते, सौ.अरुणा गवळी, सौ. धनश्री कोरवी, सौ. अनुराधा मुळीक, सौ. जयश्री कांबळे, सौ. अर्चना पागर, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, अजित ठाणेकर, संजय सावंत, आनंदराव खेडकर, तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes