+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule21 Jun 24 person by visibility 245 categoryसामाजिक
कोल्हापूर : नियमित योग साधनेतून सुर्य, हवा, पाणी आणि सभोवतालच्या निसर्गामधून उत्सर्जीत होणारी वैश्विक ऊर्जा प्राप्त होते. योगामुळे उत्साह, आनंद आणि सुखाची अनुभूती होते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी केले.  

 विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योगसाधना शिबिराचे आयोजन विद्यार्थी विकास, राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन व विस्तार कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू शिर्के बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.  

 कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, आरोग्य संवर्धनासाठी योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. मन व शरीर, विचार व कृती, संयम व निसर्ग यांच्यातील एेक्याला मूर्त रूप देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वत:शी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. विद्यापीठामध्ये सलग दहा वर्षांपासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये मोफत योग शिबीर घेतले जात आहेे.

 आज, शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी 7.20 ते 8.45 यावेळेत योगसाधना शिबीर संपन्न झाले. कुलगुरू डॉ.शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. योगसाधना शिबिरात कुुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी श्रीमती सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार सहभागी झाले. 

 विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी झाले. योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले.