केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन
schedule31 Aug 25 person by visibility 224 categoryराज्य

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचे गणेश मूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरीता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस तसेच श्री. नड्डा यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.