उत्सव काळात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू
schedule31 Aug 25 person by visibility 269 categoryदेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौत एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान फटाक्यांचा कारखाना बेकायदेशीर असल्याची माहिती मिळत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुर्सी रोडवरील गुंडबा येथील बेहटा गावात ही भीषण स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचून बचाव पथकांनी बचाव कार्य सुरु केले. अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला आहे. तर काहींनी २ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फटाक्यात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या उपचाराची योग्य ती व्यवस्था करण्याचेही आदेश दिले.