SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळाउत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनीआंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन: अनुभव आणि आदराचा उत्सवराजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगतगोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभ

schedule01 Oct 26 person by visibility 134 categoryक्रीडा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपायुक्त किरणकुमार धनवाडे व प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला आज दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुधाळी येथील महापालिकेच्या शूटिंग रेंजमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. ही स्पर्धा दि. १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, रायफल शूटिंग मार्गदर्शक रमेश कुसाळे तसेच शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव उपस्थित होते.
महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रायफल शूटिंग या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शालेय स्तरावर क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी शिवतेज खराडे, सचिन पांडव, सिद्धार्थ कुराडे, अनुराधा खुडे, युवराज चौगले, संतोष जाधव, सुहास जगदाळे, धैर्यशील देसाई, अथर्व भिवसे, ऋषिकेश वाखरेकर व विनय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes