SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन; १७ नोव्हेंबरला शहरात आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभसंभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुखाद्य अनुदानासाठी गोकुळचा पुढाकारईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी!राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह: विज्ञानाचा खरा अर्थ मानवी कल्याणासाठीशिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहितीदुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्राचे विशेष पॅकेज द्या; खासदार धनंजय महाडिक यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन; १७ नोव्हेंबरला शहरात आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

schedule15 Nov 26 person by visibility 132 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कनिष्ठ लिपिक सुनील गेजगे, अरुण जमादार, प्रीतम वडगावकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

  दरम्यान, भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६ निमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी शहरात भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  शहरातील सर्व ११ नागरी आरोग्य केंद्रे, २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच महापालिकेच्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.  या शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून आवश्यकतेनुसार तपासणी व संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांच्या आरोग्याची तपासणी, लसीकरण तसेच पोषणविषयक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

    या शिबिराचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes