मेन राजाराम कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा..
schedule15 Sep 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी भाषेचा अधिकाधिक प्रचार,प्रसार होण्यासाठी व भाषा वृद्धिंगत होण्यासाठी कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
हिंदी है मेरे देश की बिंदी, हिंदी विषय का महत्व,मुंशी प्रेमचंद या विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण निबंध लिहून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
यामध्ये कला शाखेतील इयत्ता ११वी तील संचिता माळवी (प्रथम) मेहजबीन मुल्लाणी (द्वितीय) प्रियांका कुरणे,रिधिमा पाल (तृतीय)सिद्धी माने (उत्तेजनार्थ) तसेच इ.१२वी मध्ये ऋषाली कांबळे (प्रथम) कल्याणी हिरेमठ(द्वितीय) पद्मिनी पद्मिनी उमेश गवळी (तृतीय) अनुष्का खोत (उत्तेजनार्थ)
यशस्वी विद्यार्थ्यांना काॅलेजचे प्राचार्य डॉ गजानन खाडे, उपप्राचार्या प्रा वनिता खडके, हिंदी विभाग प्रमुख प्रा सुषमा पाटील, ज्येष्ठ शिक्षक प्रा अनिल लाड, प्रा बाबासाहेब माळवे, प्रा.बाबुराव यादव, प्रा भाऊसाहेब धराडे, प्रा. राहूल देशमुख,प्रा प्रमिला मळगे यांचे मार्गदर्शन लाभले.