ईद ए मिलादनिमित्त "यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र" तर्फे राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन
schedule15 Sep 25 person by visibility 105 categoryसामाजिक

▪️ कोल्हापुरात ३८ रक्तदात्यांनी दिले अमूल्य योगदान
कोल्हापूर : ईद ए मिलाद (प्रेषित मुहम्मद जयंती) या पवित्र निमित्ताने "यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र" या युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ८०२० लोकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
कोल्हापुरातही या उपक्रमाचा भाग म्हणून १४ सप्टेंबर रोजी मुस्लिम बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३८ उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी कार्याला पाठिंबा दिला.
शिबिराच्या यशामध्ये यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तैहसीन काझी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले,
यावेळी सोहेल जामखंडीकर, निहाल शेख, मुस्तफा बागवान, अरबाज बागवान, उमर मुजावर, इजहारूल पटेल, जैद नांदनीवालां, अशपाक पठान आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अथक मेहनत घेतली.
"रक्तदान हे श्रेष्ठ दान" या भावनेने प्रेरित होत, या उपक्रमामार्फत समाजामध्ये एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.