अमेरिकेच्या अन्यायकारक करवृद्धीविरोधात भर पावसात कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृतीचे आंदोलन !
schedule01 Sep 25 person by visibility 259 categoryसामाजिक

▪️अमेरिकन वस्तूंवर देशव्यापी बहिष्काराचे आवाहन !
कोल्हापूर : अमेरिकेने भारतीय मालावर ५० % इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध संघटनांनी ‘मॅकडोनाल्ड्स्’ समोर (हॉटेल सयाजी शेजारी) निदर्शने करत अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी वापरलेल्या ‘स्वदेशी’च्या शस्राचा पुन्हा एकदा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ह.भ.प. महादेव यादव महाराज, आरोग्य भारतीच्या डॉ. अश्विनी माळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे करवीर तालुका समन्वयक शरद माळी, युवासेनेचे सागर पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनासाठी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महिंद्र अहिरे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक अशोक गुरव आणि आप्पासाहेब गुरव, विश्व हिंदु परिषदेचे विजय पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कागल तालुका संयोजक किरण कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप दळवी, मनोज चौगुले, संभाजी थोरवे, सतीश पाटील, युवा सेनेचे श्री. सचिन नागटिळक, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे, उद्योजक आनंद पाटील, शिवसेनेचे श्री. बाळासाहेब नलवडे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.
या अन्यायाला उत्तर म्हणून मॅकडोनाल्ड्स (McDonald’s) , केएफसी (KFC) , बर्गर किंग (Burger King), पिझ्झा हट (Pizza Hut) , डॉमिनोज (Domino’s) स्टारबक्स (Starbucks) , डंकिन डोनट्स (Dunkin’ Donuts),सेव्हन अप (7UP), कोका-कोला (Coca-Cola), स्प्राईट (Sprite),, फॅन्टा (Fanta), लेज (Lay’s), अॅमेझॉन (Amazon) , उबेर (Uber) , नेटफ्लिक्स ((Netflix) कोलगेट (Colgate), पामोलिव्ह (Palmolive),जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) यांसारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवजी देशी वस्तूंचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.