पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे प्रजासत्ताक दिनी वितरण
schedule23 Jan 26 person by visibility 46 categoryराज्य
कोल्हापूर : सदविचार, धर्मनिष्ठा, त्याग, समर्पण, दुरदर्शी धोरण अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या सर्वाभिमुख व्यक्तीमत्वाचा आदर्श जोपासून स्त्रियांनी पुढे यावे यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हास्तरावर प्रदान करण्यात येतो.
पुरस्कार प्राप्त समाजसेविका यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आहे.
यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सन 2020-21 साठी शोभादेवी रामराव पाटील, गजानन निवास, मु.पो.भादोले, ता हातकणंगले, सन 2021-22 साठी राजश्री जंबकुमार साकळे, उदयसिंह गायकवाड रोड, ताराबाई पार्क, कोल्हापूर, सन 2022-23 साठी वर्षा बाजीराव पाटील, नवी सडक, मु.पो.म्हाकवे, ता. कागल, कोल्हापूर व सन 2023-24 साठी वर्षा आनंदा शिंदे, मु.पो.राशिवडे बु., ता. राधानगरी, कोल्हापूर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी रक्कम रु. 10,001/-, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात येते.