थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार
schedule05 Jul 26 person by visibility 172 categoryसामाजिक
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा पैलवान आणि सेना केसरी पैलवान गौरव पाटील हा कोपार्र्डेच्या कुस्ती संकुल केंद्रात सराव करतो. गौरव पाटील यानं थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. कोपार्डे गावच्या मातीत घाम गाळून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार्या पैलवान गौरवचे कुस्तीप्रेमींसह विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पैलवान गौरवचा आज सत्कार करण्यात आला आणि जागतिक पातळीवरील कुस्त्यांसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. मेहनत, चिकाटी आणि अखंड देशप्रेमाच्या जोरावर मिळवलेलं गौरवचं यश केवळ कोपार्डे गावाचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचवणारं आहे. गौरवनं आणखी यश संपादन करावं, यासाठी महाडिक परिवार त्याच्या पाठीशी असेल, असे उद्गार खासदार महाडिक यांनी काढले.
यावेळी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे उपस्थित होते.