SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभागज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "जलद चालण्याची स्पर्धा" उत्साहातपरदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळयड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदानकोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळाउत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनी

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभाग

schedule01 Oct 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई),नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' , विविध पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल 2000 स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाली. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. 

संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले "उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ देऊन त्यांना इनोव्हेशनसाठी प्रोत्साहन देणे हा 'इंपल्स'चा प्रमुख उद्देश आहे. समस्या निराकरण, चिकित्सक विचारसरणी यातून संशोधकाचे व्यक्तिमत्व घडत असते. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्रनिर्मितीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतात". 

प्रमुख पाहुणे आयएसटीईच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, "‘इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि स्टार्टअप’च्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी ‘इंपल्स’सारख्या स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतात. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने विचार करण्याची प्रेरणा मिळते, तसेच विविध कल्पना आणि अनुभवांचे आदान-प्रदान घडून येते. ‘जेन-झी’ पिढीने आपली ऊर्जा, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान समाजहितासाठी वापरावे. तंत्रज्ञानाचा वाढत्या  वापरामुळे जबाबदारीही वाढत आहे. संशोधनशील दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि सकारात्मक विचारप्रक्रिया यामुळेच इनोव्हेशनला योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडावे ". 

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी  आपल्या संदेशात म्हटले की, “उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा तांत्रिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना नवकल्पना, समस्या सोडविणे आणि टीमवर्क यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधी अधिक व्यापक होतील" 

या स्पर्धेमध्ये  इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुप, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुपमधील अत्याधुनिक तांत्रिक विषयांवर स्पर्धकांनी पेपर प्रेझेंटेशन केले तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये विविध प्रतिकृती तयार केल्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कॅड मास्टर्स ,  सर्व शाखांसाठी क्विझ कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेसेंटेशन आयोजित केले.  हॅकॅथॉन, सर्किट मेकिंग, कोडवार, इनोस्पार्क , बॅटल ऑफ ब्रेन , अशा विविध  स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे नेटके नियोजन, उत्तम भोजन व्यवस्था, आकर्षक बक्षिसे, विविध विषयांवरील माहितीचे आदान प्रदान यांची संधी मिळाल्यामुळे सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले.
 
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी तज्ञ परीक्षक, सहभागी स्पर्धक, विद्यार्थी , विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक प्रा. अनिसअहमद नदाफ आणि प्रा. सागर दळवी यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन प्रा. आरती चव्हाण, प्रा. रोहिणी रसाळ यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes