SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभागज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "जलद चालण्याची स्पर्धा" उत्साहातपरदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळयड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदानकोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळाउत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनी

जाहिरात

 

कोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

schedule01 Oct 26 person by visibility 220 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक, विभागीय कार्यालय क्र. १ (गांधी मैदान) तसेच इस्टेट व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने कळंबा साई मंदिर परिसरातील महापालिकेच्या रिकाम्या जागेत उभारण्यात आलेल्या २५  हातगाड्यांवर आज कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले.

 महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही हातगाडीधारक व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटविले. मात्र, महापालिकेकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांचे अनधिकृत साहित्यही जप्त करण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने व उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

   या कारवाईमध्ये सहायक आयुक्त उज्वला शिंदे, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक रवी कांबळे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक, उपद्रव शोध पथक, इस्टेट विभाग व विभागीय कार्यालय क्र. १ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes