SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभागज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "जलद चालण्याची स्पर्धा" उत्साहातपरदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळयड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदानकोल्हापूर महापालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेला प्रारंभआचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळाउत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनी

जाहिरात

 

आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावा

schedule01 Oct 26 person by visibility 116 categoryमहानगरपालिका

◼️नवरात्रोत्सव काळात स्वच्छता व्यवस्थेसाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आरोग्य निरीक्षकांच्या विविध कामकाजाचा आढावा आज घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याबाबत विविध सूचना देण्यात आल्या. या बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव काळातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

 गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव कालावधीत स्वच्छता व्यवस्था राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मार्केट परिसरातील स्वच्छता, सेवा शुल्क आकारणी व वसुली, टिप्परच्या फेऱ्यांचे नियोजन, ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे पूर्ण क्षमतेने कचरा वाहतूक आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेणे, सुरक्षा किटचा वापर, ड्रेसकोडनुसार गणवेश परिधान करणे, बल्क वेस्ट जनरेटर (BWG) नोंदणी पूर्ण करणे, स्मशानभूमीची व्यवस्था व नियमित स्वच्छता राखणे, तसेच घनकचरा व्यवस्थापनांतर्गत क्युआर कोड प्रणालीचे स्कॅनिंग व मॉनिटरिंग करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता व्यवस्थेची नियमित तपासणी करुन तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिले. तसेच बल्क वेस्ट जनरेटर नोंदणी पूर्ण करण्यास प्राधान्य देणे, कामकाजाचा नियमित आढावा घेणे, उपद्रव शोध पथकांमार्फत क्षेत्रनिहाय पाहणी करणे आणि स्वच्छता व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

यावेळी मुख्य अरोग्य निरिक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीर, विभागीय आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes