SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पणविज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्माडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयशगोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीगौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

आरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पण

schedule16 Sep 26 person by visibility 154 categoryमहानगरपालिका

◼️जुन्या जेसीबीची अवघ्या अडीच लाखांत दुरुस्ती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पण महापौर  रूपाराणी निकम यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या टाटा हिताची कंपनीच्या जेसीबीची महापालिकेच्या यंत्रशाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन दुरुस्ती करून तीही आरोग्य विभागाच्या सेवेत पुन्हा दाखल करण्यात आली.

 या दोन्ही जेसीबीमुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या दैनंदिन कामकाजाला अधिक गती मिळणार आहे.

महापालिकेकडे असलेल्या टाटा हिताची कंपनीच्या जेसीबीमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे यंत्र बंद होते. कंपनीकडून संपूर्ण इंजिन बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, महापालिकेच्या यंत्रशाळा विभागातील कुशल कर्मचाऱ्यांनी उपलब्ध साधनसामग्री व तांत्रिक कौशल्याच्या आधारे या जेसीबीची महापालिकेच्या यंत्रशाळेतच ओव्हरहॉलिंग करून दुरुस्ती केली. या कामासाठी केवळ अडीच लाख रुपये खर्च झाला असून, कंपनीने सुचविलेल्या खर्चाच्या तुलनेत महापालिकेची सुमारे साडेसात लाख रुपयांची बचत झाली आहे.

  नवीन जेसीबीचे लोकार्पण तसेच दुरुस्ती करण्यात आलेल्या जेसीबीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण यावेळी महापौर  रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, सभागृहनेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती संजय मोहिमे, विशाल चव्हाण, क्रिडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, नगरसेवक-नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

  दोन्ही जेसीबी आरोग्य विभागाच्या सेवेत उपलब्ध झाल्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दैनंदिन कामकाजासाठी एकूण सहा जेसीबी उपलब्ध झाले आहेत. यामुळे शहरातील कचरा उठाव, स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणची साफसफाई तसेच विविध आरोग्यविषयक कामांमध्ये यंत्रसामग्रीचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे.

   महापालिकेच्या यंत्रशाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे मोठा खर्च टाळून महापालिकेच्या निधीची बचत झाली असून उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षम वापर आणि खर्चात बचत या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes