SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मुख्य रस्त्यांवरील खराब चेंबर दुरुस्तीला गतीएमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्यगणेशोत्सवात कायदा मोडाल तर याद राखा! करवीर उपविभागात १७२ सराईत गुन्हेगारांची ओळखपरेड; पोलिसांचा कडक इशाराके एम सी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजराशालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देशतर्कसंगत विचारांना एआय पर्याय असू शकत नाही राजश्री मोरे : माध्यम संशोधन विषयावर विद्यापीठात कार्यशाळाडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेपकेन चेस अकॅडमीचा डबल धमाका! हर्ष व नारायणी यांना आंतरराष्ट्रीय जलद रेटिंगशिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

जाहिरात

 

कोल्हापूर : मुख्य रस्त्यांवरील खराब चेंबर दुरुस्तीला गती

schedule05 Sep 26 person by visibility 81 categoryमहानगरपालिका

◼️प्रत्येक विभागीय कार्यालयास १० लाखांची तरतूद; पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणीही उपाययोजना
◼️आज अखेर 104 ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे नवीन चेंबर बसविणे व जुने चेंबर वर उचलण्यात आले

कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी खराब झालेले तसेच पावसाचे पाणी साचून राहणारे चेंबर दुरुस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील चारही विभागीय कार्यालयांना प्रत्येकी १० लाख रुपये, अशी एकूण ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून खराब चेंबर बदलणे, रस्त्याखाली गेलेले चेंबर वर उचलणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करणे तसेच खराब झालेल्या पाइप व क्रॉसिंगची दुरुस्ती करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.

विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या कामांमध्ये संध्यामठ परिसर, सिद्धार्थनगर, गोखले कॉलेज चौक, उत्तरेश्वर पेठ परिसरातील एकूण २७ खराब झालेले चेंबर बदलणे व जुनी चेंबर उचलून बसविण्यात आले आहेत. तसेच रुईकर कॉलनी, निशा हॉटेल परिसर, शाहूपुरी पोलिस स्टेशनसमोरील परिसर, मुक्त सैनिक परिसर व शाहूपुरी पोलिस स्टेशन परिसरात सुमारे ३० चेंबरची दुरुस्ती व बदलाची कामे करण्यात आली आहेत.
याचबरोबर विनोद कॉर्नर, शाहू मिल परिसर, सम्राटनगर परिसर आदी ठिकाणी सुमारे १७ चेंबरची कामे करण्यात आली असून जेव्हा नाना पार्क परिसरात 30 चेंबर ची कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी क्रॉसिंग तसेच खराब झालेल्या पाइपचीही दुरुस्ती व बदल करण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तेथील चेंबरची दुरुस्ती व पाण्याचा निचरा सुरळीत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ही कामे तातडीने पूर्ण केल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची समस्या कमी झाली असून, खराब चेंबर बदलल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत नसल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे.
शहरातील रस्त्यांवरील खराब चेंबर, पाण्याचा निचरा आणि संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकतेनुसार तातडीने दुरुस्ती करण्याची कार्यवाही पुढेही महापालिकेच्या वतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes