SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
के एम सी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजराशालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देशतर्कसंगत विचारांना एआय पर्याय असू शकत नाही राजश्री मोरे : माध्यम संशोधन विषयावर विद्यापीठात कार्यशाळाडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेपकेन चेस अकॅडमीचा डबल धमाका! हर्ष व नारायणी यांना आंतरराष्ट्रीय जलद रेटिंगशिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख

जाहिरात

 

के एम सी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

schedule05 Sep 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज, कोल्हापूर येथे ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त अकरावी व बारावी कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचा अनुभव घेतला.

यावेळी अमृता रेळेकर, सायली जोगी, जय जाधव, प्रतीक्षा लोंढे, हर्षवर्धन दबडे, आसमा मुजावर, रिया माने, तेजस्विनी सूर्यवंशी, सर्वेश अधिकनवर, हरी पाटील, सोफिया मुजावर, अनन्या चौहान, प्रतीक चौगुले, प्रीती गोसावी, धनराज जाधव आणि निरंजन भोसले या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथपाल, प्रा .आर .आर.मांगले  होते. त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच आदिती देवकुळे आणि शिक्षकांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर तसेच पर्यवेक्षक कॅप्टन डॉ. अमित रेडेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार प्रा. एच. टी. कांबळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. संदीप गावित, प्रा. विशाल वैराट, प्रा. स्वप्निल जाधव, प्रा. मयुरी तिकोडे आणि प्रा. प्राजक्ता पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. कुमुदिनी देसाई यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes