SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दानोळीत शादीखाना हॉलसाठी २५ लाखांचा निधी; आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाईकोल्हापूर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्यावतीने शहरात साखर वाटपवातानुकुलित, पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी : खासदार धनंजय महाडिक कोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या धज्जिया उडवणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कठोर कारवाई कराउपसंचालक प्रवीण टाके यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदलीउपेक्षितांच्या वेदनेला वाचा फोडणारे युगपुरुष: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतीय असंतोषाचे जनक: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सैनिक टाकळीत भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल आणि सैनिकी कॅन्टीन उभारणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जाहिरात

 

कोल्हापूर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्यावतीने शहरात साखर वाटप

schedule01 Aug 26 person by visibility 161 categoryसामाजिक

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच (खंडपीठ) सुरू करण्याची अधिकृत अधिसूचना ०१ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आली. या अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त 'पदवीधर मित्र'च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर व राशन धान्य दुकान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात साखर वाटप करून वर्षपूर्ती आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी गेल्या ४० वर्षे वकील, पक्षकार, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तसेच या कार्यक्षेत्रातील सर्वच जनतेच्या वतीने विविध आंदोलने झाली. गेल्या फेब्रुवारी-२०२५ मध्ये माणिक पाटील यांनी यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात केलेल्या ९ दिवसांच्या आमरण उपोषणाची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठाबाबत ठोस आश्वासन दिल्यानंतरच, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे हस्ते करण्यात आली. कोल्हापूर खंडपीठाबाबतचे हे शेवटचे आंदोलन ठरले असून खंडपीठ सुरू झाल्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

या वर्षपूर्ती आनंदोत्सव सोहळ्यात मुस्लिम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी, संदिप नट्टे, पी.एस. जाधव, प्रशांत कुलकर्णी, रविंद्र पाटील-यवतीकर, आर.एम. पाटील, प्रकाश हिरेमठ, किशोर खेडेकर, नागेश राणे, राजन जाधव, प्रदिप शेलार, सुनिल थोरवत, राजू बंडगरल, विशाल इंगवले, ऋतुराज शेलार आदी मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes