कोल्हापुरात ईद-मिलाद-उन-नबी निमित्त जुलूस उत्साहात
schedule10 Sep 25 person by visibility 263 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील ईद-मिलाद-उन-नबी उत्सव कमिटीतर्फे हजरत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसा निमित्त आज बुधवारी ईद-मिलाद दुन्ननबी जुलूस (मिरवणूक ) मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
नंगीवाली चौक येथून जुलूसला प्रारंभ होऊन हजारत सैय्यद गुडणपीर दर्गाहा मार्गे, हजरत सैय्यद शहा जमाल( बाबू जमाल ) दर्गाह येथे सांगता झाली. मिरवणुकीमध्ये पवित्र मक्का, मदिनाच्या प्रतिकृती सहभागी होत्या.
या मिरवणुकीमध्ये हाजी फिरोज सतारमेकर, जुलूस कमिटी संस्थापक अध्यक्ष अल्ताफ काजी, हाजी रशीद काजी, हाजी लियाकत मुजावर, गणी आजरेकर, शकील मतवल्ली, मुस्तफा खान, फैयाज शिकलगार, आश्कीन आजरेकर, ईद-मिलाद-उन-नबी उत्सव कमिटी सदस्य, मुस्लिम बांधव सहभागी झाले होते .