गोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिक
schedule19 Oct 26 person by visibility 148 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा आलेला निकाल अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मात्र, गोकुळच्या सभासदांनी दिलेला हा कौल आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. या निकालाचे महायुती म्हणून सखोल परीक्षण आणि आत्मचिंतन केले जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
खा. महाडिक यांनी विरोधी पक्षाची भूमिका आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट केली. ते म्हणाले की, "गोकुळ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. त्यामुळे संघाची प्रगती व्हावी आणि बळीराजाच्या घामाला योग्य न्याय मिळून दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू."
"संघाचा कारभार योग्य आणि शेतकरी हिताचा असल्यास महायुतीकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, जर सभासद आणि दूध उत्पादकांच्या अहिताची किंवा चुकीची धोरणे राबवली गेली, तर त्याला ठाम विरोध केला जाईल," असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती म्हणून यापुढेही नेहमीच सकारात्मक आणि आक्रमक भूमिकेतून कार्यरत राहू, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
गोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिक
schedule19 Oct 26 person by visibility 149 categoryराजकीय