आमदार सतेज पाटलांची गोकुळ निवडणुकीत कमाल; समविचारी आघाडीची बाजी!
schedule19 Oct 26 person by visibility 185 categoryराजकीय
◼️महाविकास आघाडी १३ तर महायुती १२ जागांवर; अंतिम निकालावरून मतमोजणी केंद्रावर रंगले नाट्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागेवर यश मिळवत सत्ता काबीज केली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने गोकुळच्या २५ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीच्या शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
गोकुळच्या २५ जागांसाठी रविवारी ९९.९६% इतके विक्रमी मतदान झाले होते.
सोमवारी सकाळी ८ वाजता कोल्हापुरातील शासकीय धान्य गोदामाजवळील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीला सुरुवात झाली. ३५ टेबलवर तालुकानिहाय मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीपासूनच या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा मोठा फटका महायुतीला बसल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने महिला आणि इतर राखीव ५ जागांवर पूर्ण विजय मिळवला.
प्रमुख पराभूतांमध्ये विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास आबाजी पाटील, शौमिका महाडिक, युवराज पाटील आणि सचिन घोरपडे यांच्या नावांचा समावेश आहे.
दरम्यान, अत्यंत कमी फरकाने निकाल असल्याने संध्याकाळी ५ नंतर आमदार सतेज पाटील समर्थकांसह मतमोजणी स्थळी ठाण मांडून बसले. तर दुसरीकडे विश्वास नारायण पाटील आणि युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरा प्रशासनाकडून अधिकृत निकाल जाहीर झाला , मात्र समविचारी आघाडीने मिळवलेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसर आणि अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर प्रचंड जल्लोष केला.
◼️गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल २०२६
एकूण जागा : २५
◼️शाहू समविचारी आघाडी
नेतृत्व : आमदार सतेज पाटील
एकूण विजयी उमेदवार : १३
◼️सर्वसाधारण गट (८ जागा)
1. अभिजित प्रभाकर तायशेटे
2. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
3. किसन बापूसो चौगले
4. बाबासाहेब श्रीपती चौगले
5. राहुल बजरंग देसाई
6. विद्याधर बाबुराव गुरबे
7. बाबासाहेब विष्णू देवकर
8. विश्वजीत दिनकरराव जाधव
◼️महिला राखीव गट (२ जागा)
9. अंजना केदारी रेडेकर
10. भाग्यश्री धीरज डोंगळे
◼️इतर मागासवर्गीय गट (१ जागा)
11. शशिकांत शामराव खोत
◼️अनुसूचित जाती गट (१ जागा)
12. राजू बाबा आवळे
◼️भटक्या-विमुक्त जमाती गट (१ जागा)
13. बयाजी शेळके
◼️शाहू समविचारी आघाडी : १३ जागांवर विजय
🟣 महायुती आघाडी
◼️एकूण विजयी उमेदवार : १२
◼️सर्वसाधारण गट (१२ जागा)
1. राहुल पांडुरंग पाटील
2. चेतन अरुण नरके
3. अजित शशिकांत नरके
4. अंबरीषसिंह संजय घाटगे
5. विरेंद्र संजय मंडलिक
6. मदन बाबुराव देसाई
7. राजेश नरसिंगराव पाटील
8. रणजितसिंह दिलीपराव पाटील
9. रणजितसिंह कृष्णराव पाटील
10. अजित पांडुरंग पाटील
11. कर्णसिंह गायकवाड
12. अमर पाटील (कोडोली)
◼️महायुती आघाडी : १२ जागांवर विजय
🟣 अंतिम निकाल : शाहू समविचारी आघाडी १३ जागा | महायुती आघाडी १२ जागा
