उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 26 जानेवारीला शाळांमध्ये साक्षरता शपथ
schedule23 Jan 26 person by visibility 51 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिले असून हा कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीत अंमलात आणण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय तसेच शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गाव व साक्षरता शपथ घेण्यात यावी, जेणेकरून 100 टक्के साक्षर महाराष्ट्र घडविण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी दिली आहे.