आमदार अमल महाडीक यांच्याकडून स्वखर्चातून एक हजार एलईडी दिवे
schedule06 Dec 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पथदिवे नादुस्त अवस्थेत असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील उपनगरीय भागात पथदिवे नसल्यामुळे गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर नागरीकांना समस्यांना सामना करावा लागत होता. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडीक यांनी शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलण्यासाठी वेळोवेळच्या बैठकीत सूचना दिल्या होत्या.
पथदिवे बदलण्याचा आर्थिक भार महापालिकेवर न टाकता लोक सहभागातून पथदिवे उपलब्ध करण्याची ग्वाही आमदार महाडीक यांनी दिली होती. त्या अनुषंगाने आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आमदार अमल महाडीक यांनी एक हजार एलईडी दिवे महापालिकेकडे सुपुर्त केले. हे दिवे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहा.अभियंता विद्युत पुजार, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, प्रितेश दोषी, ओमकार वर्दे, दिलीप आयरे उपस्थित होते.