मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात
schedule01 Apr 24 person by visibility 393 categoryगुन्हे
मुंबई : जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये फिरत असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील दोन गाड्यांची धडक होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पोलीस व्हॅनसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.