मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश; आठ पैकी हैदराबाद गॅझेटसह सहा मागण्या मान्य; आंदोलकांचा विजयोत्सव
schedule02 Sep 25 person by visibility 416 categoryराज्य

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर तसेच अन्य मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी उपोषण सोडताच मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी आझाद मैदानावर शेकडो आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला.
मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकारकडून 6 मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे आझाद मैदानावर शेकडो आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील भावूक झालेले दिसले.
गेल्या अनेक वर्षांपासूनच हा लढा सुरू होता. अनेक वेळा जरांगे हे उपोषनाला बसले होते. मागच्या चार दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता. आज अखेर सरकारने त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी सरकारचे आभार मानले.