डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या मोहन जाधव यांना पीएच.डी.
schedule20 Jan 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे मोहन महादेव जाधव यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांच्या व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास या विषयावरील प्रबंध त्यांनी सादर केला होता. या संशोधनात रुग्णालयांच्या दर्जेदार सेवेसाठी व्यवस्थापन कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रा. (डॉ.) चंद्रहंस चव्हाण, संशोधन केंद्र प्रमुख, जमनालाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई व प्रा. (डॉ.) नितीन माळी यांनी सखोल परीक्षण केले.
जाधव यांना सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. डी.गिरीगोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. केदार मारुलकर, माजी विभागप्रमुख प्रा.डॉ. ए.एम.गुरव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, माजी कुलगुरु डॉ. बी. पी. साबळे, कुलगुरू डॉ.राकेशकुमार शर्मा, आय.क्यू.ए.सी.संचालक डॉ. शिंपा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.