डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड
schedule03 Jul 25 person by visibility 164 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवर कॅम्पस इंटरव्हयूव्दारे निवड झालेली आहे. यामध्ये डीमार्ट, ऍक्सिस बँक, अदित्य बिर्ला कॅपीटल, एसयुडी लाईफ, टाटा एआयजी, एसबीआय हेल्थ, ऍक्युटेक पॉवर सल्युएशेन, सॅक सेेमीकंडक्टर, बजाज फायनान्स, आयसीएफेआय, आयप्रोसेस, स्टार लोकल मार्ट यांसारख्या कंपन्याचा समावेश आहे. एमबीए डिपार्टमेंटला नुकतेच एनबीए चे मानांकन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच प्लेसमेंटमध्येही त्याचा फायदा होत आहे.
डीकेटीईच्या एम.बी.ए. विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी विविध उद्योगजगतातील मान्यवरांचे वेळोवेळी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येेते. या व्यतीरिक्त विविध तज्ञ मान्यवरांचे नोकरी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात व मुलाखती संदर्भात सॉफ्ट स्किल च्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि करिअरच्या संधी प्राप्त होतात. याआगोदरही अनेक विद्यार्थ्यांची निवड नामांकित बँका, फायनान्सिएल संस्था, पुणे, मुंबई, बेंगलोर येथील प्रतिष्ठित कंपन्यामध्ये झालेली आहे.
इचलकरंजी व परिसरात डीकेटीईचा एमबीए अभ्यासक्रम एक विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण पर्याय ठरला आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी सतत कॅम्पस इंटरव्हयूवचे आयोजन केले जाते तसेच कॅम्पसच्या तयारीसाठी वैयक्तीक लक्ष देवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो. हा उज्ज्वल यशाचा टप्पा संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली आणि विद्यार्थी कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे फलित असून संस्थेच्या पुढाकारामुळेच विद्यार्थ्यांना देशभरातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
निवड झालेल्या सर्व एम.बी.ए. विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख प्रा.पी.एस.जाधव सर्व प्राध्यापक वर्ग, टीपीओ प्रा.ए.एस.गणपते यांचे मार्गदर्शन लाभले.