गडमुडशिंगी येथे एन. सी. एस., न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्तविद्यमाने मेगा जॉब फेअरचे सोमवारी आयोजन
schedule03 Jul 25 person by visibility 136 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : एन. सी. एस.(श्रम व रोजगार मंत्रालय, केंद्र सरकार) आणि न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, गड मुडशिंगी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 जुलै 2025 रोजी न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शांतीनगर, गड मुडशिंगी, उंचगाव येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येत आहे.
हा जॉब फेअर दोन प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 400 पद भरतीसाठी होणार असून डिप्लोमा (सर्व शाखा) पास सर्व उमेदवारांसाठी आहे. या जॉब फ़ेयरचा 21 ते 30 या वयोगटातील जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन नितिन पाटील, डॉ संजय दाभोले (एन.आय.टी. कोल्हापूर) यांनी केले आहे.
खालील क्यूआर कोड स्कॅन करा, ऑनलाइन नोंदणी करा आणि मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.