SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतयूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्यगडमुडशिंगी येथे एन. सी. एस., न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्तविद्यमाने मेगा जॉब फेअरचे सोमवारी आयोजनकोल्हापुरात 39 घरामध्ये आढळल्या डेंग्यू डासाच्या अळया; 14 तापाचे रुग्ण आढळले; कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षण २ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार, चोरीचा माल घेणाऱ्या ३ तिघासह ५ आरोपींना अटक; घरफोडीचे १२ गुन्हे उघड !जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट पर्यंत...पूर्वापार गाडीवाट रस्त्याचा वाद सामंजस्याने निकाली काढण्याचे प्रयत्न : तहसीलदार ऋषिकेत शेळके डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावना

जाहिरात

 

बबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावना

schedule03 Jul 25 person by visibility 150 categoryसामाजिक

▪️शोकसभेत कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव  जाधव यांना श्रद्धांजली अर्पण

कोल्हापूर : “समाजासाठी जीवन झोकून देणारे, शिवभक्ती व अध्यात्मातून एक नवा आदर्श उभा करणारे कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव म्हणजेच आपल्या सर्वांचे दादा, आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश आमच्या मार्गदर्शनासाठी सदैव जिवंत आहे. त्यांची शिकवण, त्यांच्या आठवणी आणि कार्याच्या पायवाटेवरूनच आम्ही चालत राहणार आहोत” अशा शब्दांत माजी आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कैलास गडची स्वारी मंदिरात आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या. मंदिरचे उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.

दादा आणि दिवंगत आमदार चंद्रकांत (अण्णा) जाधव यांनी आपल्या सर्वांच्या साथीने  कैलास गडची स्वारी मंदिराला केवळ एक धार्मिक स्थळ न ठेवता, ते श्रद्धा, सेवा, आणि समाजसेवेचं केंद्र बनवले. त्यांच्या स्मृतीस वंदन करत, या मंदिराची सेवा, त्याच्या प्रत्येक उपक्रमाची उभारणी आणि प्रत्येक भक्ताचा सन्मान हे सर्व मी माझ्या शंभर टक्के समर्पणाने आणि सर्वांच्या साथीने यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन, असा विश्वास मंदिरचे उपाध्यक्ष सत्यजित जाधव यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक संभाजी देवणे, अरुण आवटे, विवेक कोरडे, तानाजीराव घाटगे, प्रशांत आयरेकर, उदय कारजगार, विलास गौड यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

यावेळी शिवाजी जाधव, विठ्ठलराव जाधव, केशवराव पोवार, तानाजी जाधव, अशोक कांबळे, गणेश भोसले,  प्रदीप मराठे,  कमलाकर भोसले, प्रदीप गौड, राजू जाधव, शाहीर अजित आयरेकर, राजेंद्र काटे, रोहित कारंडे, अजय भोसले, कुलदीप भोसले,  अनिल गौड, प्रसाद भोसले, राजू गौड, हेमंत घाटगे, महेश घाटगे, आशिष पवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes