SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

28 जून रोजी कोल्हापुरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

schedule25 Jun 26 person by visibility 297 categoryआरोग्य

 ▪️शहरात 47,867 बालकांना मोफत डोस

  कोल्हापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील 47 हजार 867 बालकांना रविवारी, 28 जून 2026 रोजी मोफत पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील 173 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

  भारत सरकारने पोलिओ निर्मूलनाचा निर्धार करून 1995-96 पासून देशभर पल्स पोलिओ मोहीम सुरू केली आहे. देशात जानेवारी 2011 नंतर पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नसून 27 मार्च 2014 रोजी भारताला पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र शेजारील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने जागतिक स्तरावर पूर्ण निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

  महापालिकेने यंदाच्या मोहिमेसाठी व्यापक कृती आराखडा तयार केला असून शहरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डमध्ये एकूण 173 लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बी वॉर्ड प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.1 सावित्रीबाई फुले या प्रमुख केंद्रांतर्गत 32 लसीकरण केंद्रे, ए वॉर्ड मध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.2 फिरंगाई या प्रमुख केंद्रांतर्गत 21 लसीकरण केंद्रे, ई वॉर्डमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपूरी अंतर्गत 24 लसीकरण केंद्रे, डी वॉर्डमधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.4 पंचगंगा या प्रमुख केंद्रांतर्गत 25 लसीकरण केंद्रे, कसबा बावडा येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.5 या प्रमुख केंद्रांतर्गत 17 लसीकरण केंद्रे, महाडीक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.6 या प्रमुख केंद्रांतर्गत 31 लसीकरण केंद्रे सी वॉर्ड मधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.10 सिध्दार्थ नगर या प्रमुख केंद्रांतर्गत 23 लसीकरण केंद्रे असणार आहेत. याशिवाय रेल्वे स्थानक, एसटी स्थानक तसेच अंबाबाई मंदिर परिसरात परगांवावरुन येणा-या बालकांना डोस पाजण्यासाठी विशेष बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

  मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात 29 जून ते 4 जुलै दरम्यान घरभेटीद्वारे बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर बूथप्रमुख, लस पाजक, आशा सेविका, स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण मोहिमेसाठी सुमारे 1,200 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

  या मोहीमेबाबत जनजागृतीसाठी ध्वनीक्षेपक, बॅनर्स, केबल नेटवर्क तसेच स्वयंसेवकांच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाणार आहे. पालकांना स्मरण राहावे यासाठी 28 जून रोजी सकाळी 8 वाजता 11 वाजता आणि दुपारी 4 वाजता छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत सायरन वाजविण्यात येणार आहे.

  या मोहिमेस सीपीआर रुग्णालय, विविध वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालये, रोटरी क्लब, महिला मंडळे, तरुण मंडळे, शाळा-महाविद्यालये यांचे सहकार्य लाभत आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरणकुमार धनवाडे व आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या नियंत्रणाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पोलिओसारख्या अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना नजीकच्या केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजावा आणि राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes